केम येथील तरूणाने दिले कावळ्याला जीवदान
केम (संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील गावठाण परिसरात राहणाऱ्या विष्णूपंत तळेकर यांच्या घरासमोरील झाडावर आज (दि.३ जुलै) पंतगाच्या मांज्या मध्ये कावळा अडकला होता. तो सतत ओरडत होता त्यावेळेस इतरही कावळे झाडावर जमा झाले होते. हा कालवा पाहून तेथेच राहणारे केतन जाधव यांना कावळा मांज्यात अडकलेला दिसला.
त्याला बाहेर येता येत नव्हते तेव्हा केतन जाधव यांनी धाडसाने कावळ्याच्या गरड्यातून जखमी कावळ्याला बाहेर काढले. त्या वेळेस इतर कावळे अंगावर धावत होते. अशा परिस्थित मध्ये त्याने जखमी कावळ्याला खाली घेतले आणि उत्तम जाधव व आणा पाटिल यांनी या कावळ्याला अडकलेला मांजा हळूहळ काढला. त्यावेळेस त्याचे पंख निघुन पडत होते. सर्व मांजा काढल्यानंतर हळूच कावळ्याला सोडून दिले. याचे केम परिसरातून कडून कौतूक केले जात आहे