श्री उत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगास नागदेवतीची आरास

0

केम (संजय जाधव) –  करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये श्रावणी दुसऱ्या स़ोमवारी निमित्त शिवलिंगाची वेगवेगळया रूपात  सजावट केली  जाते त्या प्रमाणे दुसऱ्या स़ोमवार निमित्त  रंगीबेंरंगी फुलांची नागदेवतीची प्रतिमा करून सजावट करण्यात आली होती.

हि सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव, संजय नवले,केदार पळसकर यांनी केली. श्रावणी सोमवार असल्याने भाविकांनी मंदिरात पहाटे पासून श्री च्या  दर्शनासाठी गर्दी केली होती. ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत  होती  संपूर्ण  मंदिर भाविकांनी फुलून गेले होते.उत्तरेश्वर देवस्थानच्या मंदिरामध्ये दर सोमवारी अन्नदान असते पंरूतु श्रावणी  सोमवार  असल्याने  महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप  केले  तसेच  पहाटे  पासून   मंदिरात आलेल्या भाविकांना श्री उत्तरेश्वर भक्ताकडून मसाले दुधाचे वाटप करण्यात आले.

या मंदिरामध्ये सोमवार निमित्त वेगवेगळया रूपात शिवलिंगाची आकर्षक असी सजावट केली जाते   मंदिरामध्ये आलेल्या श्री च्या दर्शनासाठी  भाविकांचे मन प्रसन्न होते.

महंत जयंतगिरी महाराज, श्री उत्तरेश्वर देवस्थान केम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!