अबॅकस व वैदिकमॅथ स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक चौधरी यांचे मार्गदर्शन..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.8 : पुणे येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा होत आहे. या स्पर्धेसाठी मुथा अबॅकस अकॅडमी मधून 61 विद्यार्थ्यां बसणार आहेत. त्यांनी आपला सहभाग विविध लेवल्स मधून नोंदवला आहे.
या विद्यार्थ्यांना तेथे दहा मिनिट 75 गणित सोडवायचे अनिवार्य आहे. या सर्वांची प्रॅक्टीस करून घेतली आहे. हे सर्व विद्यार्थी सहा ते सात मिनिटात 75 गणित अचूक सोडवत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना जादा मार्गदर्शन करण्यासाठी मुली नंबर-1 शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी पालकांही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत मुथा अकॅडमीच्या ज्योती मुथा यांनी केले तर आभार पल्लवी भिंगारे यांनी आभार मानले.