सालसे येथील ‘अभिनव भारत समाज सेवा’ संस्थेकडून दिव्यांगांना देण्यात येणार मोफत साहित्य – अपंग बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे तालुका करमाळा या सेवाभावी संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग (अपंग) बांधव यात महिला, मुले, मुली, बालकांना संस्थेतर्फे व्हिलचेअर तसेच स्टिक मोफत देण्यात येणार आहेत. तरी इच्छूक दिव्यांग बांधवांनी आपली सर्व वैयक्तिक (आधार कार्ड, मोबाईल क्र. तसेच दिव्यांगाचा प्रकार, अंपग प्रमाणपत्र) इ. माहिती अभिनव भारत समाज सेवा मंडळ (सालसे ता.करमाळा) यांच्याकडे 15 नोव्हेंबरच्यापूर्वी द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत व सचिव योगेश जगताप यांनी केले आहे.
सालसे येथील कार्यालयात सर्व दिव्यांग बांधवांना सर्व व्हिलचेअर मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. ज्या दिव्यांग बांधवांना येणे शक्य नसेल त्यांना व्हिलचेअर घरपोच देण्यात येणार आहेत. याचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांनी घ्यावा. खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा : शिवशंकर गोसावी (प्रकल्प प्रमुख ) 9689078828- सदर क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.