करमाळा-अहमदनगर महामार्गावर मांगी येथे एस.टी.बस व मोटारसायकलचा अपघात - मोटारसायकलवरील पती-पत्नी व मुलगा गंभीर जखमी.. - Saptahik Sandesh

करमाळा-अहमदनगर महामार्गावर मांगी येथे एस.टी.बस व मोटारसायकलचा अपघात – मोटारसायकलवरील पती-पत्नी व मुलगा गंभीर जखमी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा-अहमदनगर महामार्गावर मांगी (ता.करमाळा) येथील बसस्थानकासमोर एस.टि.बस व मोटारसायकल अपघात झाला असून, या अपघातात मोटारसायकलवरील पती-पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (ता.२४) सकाळी झाला असून, यामध्ये पत्नी गंभीर जखमी असून सोलापूर येथे उपचारासाठी पाठवले आहे.

यात हकीकत अशी कि, करमाळा-अहमदनगर महामार्गावर सोलापूर-नाशिक ही नाशिक डेपोची एस.टि.बस करमाळाहून अहमदनगरकडे जात असताना मांगी (ता.करमाळा) येथील बसस्थानकासमोरुन जात असताना वडगाव (उ) (ता.करमाळा) येथील ऊसतोड कामगार पांडुरंग बबन शिंदे (वय-४५) हे आपली पत्नी सोनाली शिंदे (वय- ३०) व मुलगा गजानन शिंदे (वय १०) मोटारसायकलवरुन मांगीगावाजवळच असलेल्या ऊसाची तोडणी करण्यासाठी जात असताना भरधाव वेगात आलेल्या एस.टि.बस व मोटारसायकलचा अपघात होवून या अपघातात पांडुरंग शिंदे व मुलगा गजानन हे एका बाजूला पडले त्यांना डोक्याला मार लागून जखमी झाले तर मुलगा गजानन याचा पाय फॅक्चर झाला आहे. तर सोनाली शिंदे यांना गंभीर जखम झाली असून, त्यांना उपचारासाठी तातडीने सोलापूर येथे पाठवले आहे. अपघात झाल्याचे समजताच करमाळा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी भेट देवून जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवले आहे. तसेच एस टि बस करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!