पोथरे ग्रामस्थांच्या आंदोलनास प्रतिसाद – दारू विक्रेत्यावर कारवाई
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पोथरे (ता. करमाळा) येथील ग्रामस्थांनी गावात दारूबंदी होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर पोलीस या गावात दारू विक्री होणार नाही, यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
दरम्यान पोथरे येथील गायरान वस्तीवर दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी तेथे जाऊन दारू विक्रेत्यास रंगेहाथ पकडून त्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ११ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक बालाजी केशव घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की पोथरे हद्दीतील गायरान वाडीवर दिपक गोरख गायकवाड रा. पोथरे हा देशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच तेथे आम्ही छापा घातला असता, त्याच्याकडे देशी दारू संत्रा स्पेशलच्या ९१० रूपयाच्या १३ बाटल्या सापडल्या आहेत. या सर्व बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दारुबंदीचे आव्हान स्वीकारत पोथरेकर एकवटले – करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा