जेऊर येथे मटका घेणाऱ्या दोघांविरूध्द कारवाई..

करमाळा : जेऊर येथे कल्याण मटका घेणाऱ्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ मे ला सायंकाळी ४ वा. २५ मि. घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश विठ्ठल येवले यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की जेऊर येथे रेल्वे स्टेशनच्या बाजुला नंदकुमार दादू कसबे रा. ज्ञानेश्वरनगर, जेऊर हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता कल्याण मटक्याचे आकडे फाडताना आढळून आला आहे. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची स्लिप बुक, निळ्या रंगाचा बॉलपेन व रोख २३८० रूपये जप्त केले आहेत.
जेऊर येथे बाजारतळा जवळ अफताब महेबुब शेख रा. पांडे हाही कल्याण मटक्याचे आकडे घेताना आढळून आला आहे. त्याच्याकडून ११ हजार ९६० रुपये जप्त करण्यात आले आहेत. याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमोल शहाजी रंदील यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.





