करमाळा येथे मटक्याचे आकडे घेणाऱ्या चौघावर कारवाई..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मटक्याचे आकडे घेणाऱ्या चौघावर पोलीसांनी कारवाई केली आहे. यात करमाळा येथील जीन मैदानात साठेनगर, फंडगल्ली, जेऊर येथील रेल्वेस्टेशनजवळ येथे आकडे फाडताना ही कारवाई केली आहे.

यात पोलीस कॉन्स्टेबल तौफीक काझी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की शहरातील जीन मैदानात ३१ जानेवारीला दुपारी १ वा.४५ वाजता बाळासाहेब बाबूराव अलाट रा.साठेनगर, करमाळा हा मटक्याचे आकडे फाडताना आढळून आला. त्याच्याकडे मटक्याचे आकड्याचे पांढरे पुस्तक व १०५० रूपये रोख सापडले आहेत, ते जप्त केले आहेत.

यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की शहरातील फंडगल्लीमध्ये ३१ जानेवारीला दुपारी १ वा.०० वाजता सर्फराज गफार राज रा. फंडगल्ली, करमाळा हा मटक्याचे आकडे फाडताना आढळून आला. त्याच्याकडे मटक्याचे आकड्याचे पांढरे पुस्तक व १३५० रूपये रोख सापडले आहेत, ते जप्त केले आहेत.

यात पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की जेऊर येथील रेल्वेस्टेशन जवळील टपरीवर ३१ जानेवारीला सायंकाळी ५ वा. २० वाजता भारत चंद्रकांत पोळके रा. जेऊर हा मटक्याचे आकडे फाडताना आढळून आला. त्याच्याकडे मटक्याचे आकड्याचे पांढरे पुस्तक व ७८० रूपये रोख सापडले आहेत, ते जप्त केले आहेत.

यात पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की शहरातील साठेनगर, ३१ जानेवारीला दुपारी १२ वा. २० वाजता विश्वदत्त अबाजी मंडलीक रा. साठेनगर, करमाळा हा मटक्याचे आकडे फाडताना आढळून आला. त्याच्याकडे मटक्याचे आकड्याचे पांढरे पुस्तक व ११५० रूपये रोख सापडले आहेत, ते जप्त केले आहेत. या सर्वांच्या विरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!