जेऊर येथे दारू विक्रेत्यावर कारवाई

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जेऊर येथील लव्हे चौकात बेकायदेशीररित्या देशीदारू विक्री करताना एकजण आढळला असून पोलीसांनी त्यावर कारवाई केली आहे. हा प्रकार १७ डिसेंबरला दुपारी तीन वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की जेऊर येथील लव्हे चौकात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्यावर त्या ठिकाणी गेलो असता, आयुब रज्जाक शेख रा. पारेवाडी याचेकडे संत्रा कंपनीच्या ९८० रूपयाच्या १४ देशीदारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



