करमाळा शहरातून प्रतिबंधीत पान मसाला, गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई – १ लाख ४२ हजार रूपयाचा माल जप्त
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातून बसस्थानक परिसरातील पान टपऱ्यावर प्रतिबंधित पान मसाला, सुगंधी तंबाखू, गुटखा, मावा आदी विक्रीला बंदी असताना असे पदार्थ आढळून आले आहेत. त्यांच्याविरूध्द अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचेकडून १ लाख ४२ हजार ८५६ रूपयाचा माल जप्त केला आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागातील प्रतिनिधी नंदिनी हिरेमठ यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा येथील बसस्टॅन्ड परिसरात इरफान बागवान, सादिक बागवान, जमीर तांबोळी, नजर कुरेशी, शकील तांबोळी यांच्या पान टपरीवर प्रतिबंधित अन्न पदार्थ, सुगंधी तंबाखू, पान मसाला, नखराली सुपारी, आरएमडी पान मसाला असा १ लाख ४२ हजार ८५६ रूपयाचा माल आढळून आला आहे. यानुसार सदरचा माल जप्त करण्यात आला असून यात पोलीसांनी सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.