प्रा.शिवाजीराव बंडगर यांच्यासारखे कार्यकर्ते इतिहास घडवतात – आमदार विक्रम काळे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : प्रा.शिवाजीराव बंडगर यांच्यासारखे कार्यकर्ते हे सेवानिवृत्त होत नसतात तर ते इतिहास घडवतात असतात, असे मत शिक्षक मतदार संघातील आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले आहे. प्रा.शिवाजीराव बंडगर यांच्या सेवा गौरवासह भिमा खोऱ्यातील तब्बल 14 गुणवंताचा कौतुक सोहळा काल (ता.26) ढोकरी ता करमाळा येथील बंडगर वस्ती वर संपन्न झाला. त्यावेळी आमदार प्रा. काळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे होते.

या गौरव सोहळ्यासाठी विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सौरऊर्जेवर चालत असलेल्या अनोख्या, अत्याधुनिक बोटीतून जल सफरीचा आनंद घेत कार्यक्रम स्थळी पोहोचले तर मागील आठवड्यात संपन्न झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत निवडून येवून चौथ्यांदा विधानपरिषदेत पोहोचलेले आमदार विक्रम काळे लातूरहून कार ने आले होते.

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभा देवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी शेतकरी मेळावाही संपन्न झाला. त्याचे प्रास्ताविक केळी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले.यावेळी अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक एच.बी.डांगे हे होते.

रसायनशास्त्रातील पीएचडी धारक अरणचे डॉ.अमोल पाटील यांनी विकसित केलेले सुवर्ण ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान एकरी ९९९९/- रुपये खर्चामध्ये 100 मे टन ऊस उत्पादन कसे काढता येते याविषयी विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन केले. तसेच जमिनीचे,मातीचे आरोग्य राखण्यासाठी पीएच, सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय तसेच रासायनिक खत व पाणी यांचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्याविषयीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार विक्रम काळे यांच्या व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली.
आमदार विक्रम काळे म्हणाले, प्रा शिवाजीराव बंडगर हे माझ्या समवेत गेल्या चार पाच वर्षापासून व्यवसाय शिक्षण विभागातील विध्यार्थी व शिक्षक यांचे प्रश्न घेऊन लढत आहेत .त्यांची विध्यार्थी व शिक्षक यांच्या बद्दल ची तळमळ, धडपड मी जवळून पाहिली. मंत्र्यासोबतच्या अनेक बैठकामधे अभ्यासू पद्धतीने आपले मुद्दे ते पटवून देतात. जेणे करून शासन त्याकडे गांभीर्याने पाहते. अन सकारात्मक निर्णय घेते. काही समित्यावर ही आम्ही एकत्रित काम केले . त्यांच्या या चळवळ्या स्वभावाने प्रभावीत होऊन मी त्यांच्या सेवा गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, आजच्या दिमाखदार अशा क्रज्ञता सोहळ्याने मी प्रभावीत झालो असून असा कार्यक्रम आजपर्यंत मी पाहिलेला नाही. प्रा बंडगर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यानी बंडगरांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला . उजनी धरणग्रस्तांच्यासाठी बंडगर यानी केलेला संघर्ष अप्रतिम असून विध्यापीठ नामांतर, पाच टीएमसी पाणी वाचवण्याच्या साठी केलेल्या यशस्वी आंदोलनाचा उल्लेख करत त्यानी शुभेच्छा दिल्या. यावेळी भिमाखोऱ्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 14 गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सौरऊर्जेवर बोट निर्माण करून यशस्वी पणे चालवणार्या श्रीहरी जाधव, मंगेश जाधव यांच्यासह केळी उत्पादक संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झालेल्या महेंद्र पाटील यांच्या सह सोमनाथ खराडे,जनार्दन साळुंके, सोनाली शेटे,ललिता रकटे,शैलेश भोसले,सम्रता माने,सुनंदा रोकडे भगत,हनुमंत यादव,विकास वाघमोडे, संकेत पवार,ईश्वरी निंबाळकर, हिंदवी जगताप, प्रशांत देशमुख, आदींचा सन्मान करण्यात आला. उपस्थिताचे स्वागत ढोकरीचे सरपंच देवा पाटील, दत्ता खरात , वांगी विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन भैरवनाथ बंडगर, महादेव बंडगर, शिवाजी खरात,शुभम् बंडगर, बाबासाहेब चौगुले , अर्जुन तकिक आदिनी केले.
यावेळी मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल, गणेश करे पाटील, ॲड.डाॅ.बाबुराव हिरडे यांची भाषणे झाली. यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने सौरऊर्जेवर बोट सुरू केलेल्या श्रीहरी जाधव व मंगेश जाधव याना रोख 21000 चे पारितोषिक देवून सन्मानित केलंत तर बाकी गुणवंतांचा सन्मान सन्मान चिन्ह व मानपत्र देवून केला. प्रा शिवाजीराव बंडगर यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा शिवाजीराव बंडगर यांनी केले तर आभार शहाजीराव देशमुख यानी मानले.
या कार्यक्रमास हभप रामभाऊ महाराज निंबाळकर, निखील महाराज निंबाळकर,जि प चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, बाजार समिती चे उप सभापती चिंतामणी जगताप, माजी जि प सदस्य भानुदास पाटील, मकाई चे संचालक संतोष देशमुख, रामभाऊ हाके,गोरख जगदाळे,बापूराव कदम, उदयसिंह मोरे पाटील,खंडाळा पंचायत समिती सभापती वंदना धायगुडे पाटील, अमरजित साळुंके, डाॅ अमोल घाडगे, भिमा आबा घाडगे, बाजार समिती चे संचालक देवा ढेरे,शशिकांत केकान,रंगनाथ शिंदे, बापूराव रणसिंग, वालचंद रोडगे, आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक नानासाहेब लोकरे, संचालक पांडुरंग जाधव ,संचालक भागवत पाटील, माजी संचालक भारत आण्णा साळुंखे. वांगी नं.1चे सरपंच संतोष देशमुख, वांगी नंबर 3 चे सरपंच मयुर रोकडे, वांगी नं.4– भिवरवाडी चे सरपंच रामभाऊ सूळ, उपसरपंच डॉक्टर भाऊसाहेब शेळके सदस्य धनसिंग जयसिंगराव शेटे, वांगी नंबर 2 चे सरपंच संतोष चौधरी, उपसरपंच बशीर पटेल ,बिटरगाव चे सरपंच कुलदीप पाटील, पांगरेचे उपसरपंच विवेक पाटील, सचिन बापू पिसाळ, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हराळे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकीक, देविदास तळेकर, वांगीच्या माजी सरपंच सौ. स्वातीताई शेळके , एलआयसी विमा एजंट विठ्ठल शेळके, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे, सोमनाथ रोकडे, माळशिरस चे उपनगराध्यक्ष डाॅ मारुती पाटील, माढा विधानसभा शिवसेना प्रमुख रामभाऊ टकले,दत्ता बापू देशमुख, सुधीर बापू देशमुख, तानाजी देशमुख, वांगी सोसायटी चे चेअरमन डाॅ विजय रोकडे, संचालक नितीन देशमुख, विकास पाटील, अप्पासाहेब भोसले, नागनाथ मंगवडे, कृष्णा जाधव,नामदेव महाडिक, कांतीलाल महाडिक त्याचप्रमाणे युवा नेते युवराज रोकडे, माजी सरपंच संजय कदम,माजी सभापती लक्ष्मण दादा महाडीक, नितीन तकीक, विशाल तकीक, , दत्तू दादा सरडे अण्णा सरडे जयसिंग शेटे, बिबीशन देशमुख माजी उपसरपंच राजकुमार देशमुख, सचिन देशमुख ,चांगदेव देशमुख यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन रणजितसिंह शिंदे वाशिंबे व कोर्टीचे सचिन नवले यांनी अत्यंत उत्कृष्ट असे केले.