जेऊरचे सुपुत्र अभिनेते सुहास गायकवाड यांना “राज्यस्तरीय युवा कलाभूषण पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.२२) – जेऊर (ता.करमाळा) गावचे सुपुत्र नाट्य अभिनेता आणि चित्रपट अभिनेता सुहास सुनिल गायकवाड यांना “राज्यस्तरीय युवा कलाभूषण पुरस्कार २०२४” हा पुरस्कार रविवार दि.11 ऑगस्ट 2024 रोजी उल्हासनगर, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री.गायकवाड यांना देण्यात आला.
उल्हासनगर (जि. ठाणे) येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी विविध कलाकारांना देण्यात येत असतो. याच कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता यांना महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोमनाथ जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते





