कोर्टी-कुस्करवाडी रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता -

कोर्टी-कुस्करवाडी रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था असलेल्या कुस्करवाडी रस्त्यासाठी शासन निर्णय क्रमांक पीएलएन २०२३/सीआर ७२४७/नि_३ अन्वये २ कोटी रु. निधी मंजूरीचा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून या रस्त्यावर मुरूमीकरण, खडीकरण, मजबूतीकरण, कच्चे गटर्स, मुरुम बाजूपट्टी, डांबरीकरण होणार आहे, लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर कार्यारंभ आदेश निघून कामास सुरुवात होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

आमदार संजयमामा शिंदे यांनी गेल्यावर्षी जानेवारी 2023 महिन्यात संपूर्ण करमाळा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. 24 जानेवारी 2023 रोजी खास लोकआग्रहास्तव कुस्करवाडी येथे सायंकाळी भेट दिली होती. कुस्करवाडीकडे जात असताना अतिशय खराब आणि खाच खळग्यांचे रस्त्ते दिसून आले.

या बैठकीच्या वेळी सर्वांनी रस्त्याची एकच मागणी मांडली होती, आम्ही गेली कित्येक वर्षे पक्क्या रस्त्याची मागणी अनेक लोक प्रतिनिधींना करत आलो आहोत. परंतू तात्पुरती आश्वासने देऊन आमची बोळवण केली जात आहे. अनेक वेळा निवेदने, निवडणूकीवर बहिष्कार देखील टाकलेला आहे. कुस्करवाडीची लोकसंख्या कमी असल्याने पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी होत नव्हती, ही सर्व माहिती व समस्या जाणून घेवून खास बाब म्हणून बांधकाम विभागास शिफारस केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेपुटी इंजिनिअर उबाळे यांनीही तातडीने सर्वे करून तांत्रिक मंजुरी बाबत कार्यवाही केली.

अखेर शासन निर्णय क्रमांक पीएलएन २०२३/सीआर ७२४७/नि_३ अन्वये २ कोट रु. निधी मंजूरीचा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून या रस्त्यावर मुरूमीकरण,खडीकरण, मजबूतीकरण, कच्च्ये गटर्स, मुरुम बाजूपट्टी, डांबरीकरण होणार आहे.लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर कार्यारंभ आदेश निघून कामास सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!