उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेद व योगाचा अंगीकार करा - मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी.. -

उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेद व योगाचा अंगीकार करा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पुणे विभागातून सहा हजार ग्रामपंचायती मधून आयुर्वेद साठी जिंती गावांची निवड केंद्र शासनाने केली आहे. महिला सक्षमीकरण साठी १९१ कोटी रूपये कर्जाचे वाटप करणेत आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहे. असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बगाडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र पुंडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे,सरपंच सुनिता ओंभासे, उपसरपंच रमेश धेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गाढवे, डॉ. येवगे, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना श्री.स्वामी म्हणाले कि, मुलींचे हजारी प्रमाण वाढवा, वंशाला दिवा पाहिजे म्हणून जाच करतात. कोट्यावधी ची मालमत्ता असणारे एका मुलीवर ऑपरेशन करतात, गरीब मुलांची वाट पाहतात, मुली सायकली वाचून वंचित आहेत, आपण बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा देत आहोत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले
सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, आयुर्वेदापासून दूर जात आहोत. स्वच्छतेची काळजी घ्या. कोरोनाने स्वच्छता शिकविली, डोळ्यांस न दिसणारा व्हायरस शरीर संपवितो. मुलांना आरोग्य क्षम, संस्कारक्षम बनविणेचे काम सुरू आहे.

तसेच गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन साठी लक्ष ठेवा. गाव स्वच्छ ठेवा. बाहेर चे व्यक्तीने गाव स्वच्छ का ठेवायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वच्छ भारत मिशन योजना प्रभावी पणे राबवा असे आवाहन केले. याप्रसंगी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिंती व परिसरातील 970 ग्रामस्थांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. या शिबिरात अग्नीकर्म, स्वेदन, स्नेहन, रक्तमोक्षण, नेत्र चिकीत्सा, स्त्रीरोग, महालॅब मार्फत रक्त तपासणी आदी आरोग्य सेवांचा व उपचाराचा समावेश करण्यात आला होता.

याप्रसंगी स्वागत गीत जिंती हायस्कुलच्या नववीच्या विद्यार्थिनींनी गायले. डॉ प्रतिभा गायकवाड वैद्यकीय अधिकारी यांनी धन्वंतरी स्तवन गायले. प्रास्ताविक जिंती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गाढवे यांनी केले. सुत्रसंचलन जिंती हायस्कुलचे रामहरी झांजुर्णे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!