अॅड. अजित विघ्ने यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी निवड
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.९: करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी येथील वकील संघाचे माजी उपाध्यक्ष व केत्तूरचे माजी सरपंच अॅड.अजित विघ्ने यांची निवड करण्यात आली आहे. अॅड. विघ्ने हे अभ्यासू असून ते सतत सामाजिक कार्यात व्यस्त असतात. अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात. करमाळा न्यायालयामध्येही ते गरजू नागरिकांना कायम मदत करत असतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांचे विविध क्षेत्रात अनेक मित्र आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक मित्राचा वाढदिवस असो नाहीतर वैयक्तीक काम असो अथवा दु:खद प्रसंग असो अॅड.विघ्ने कायम सोबत असतात. त्यांची लिखाणाची शैली उत्तम आहे. वेळ देऊन व झोकून देवून काम करण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळेच पक्षांने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांचे विश्वासू व क्रियाशिल कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.