वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन ॲन्ड पार्लमेंट असोसिएशनच्यावतीने ॲड.शहानुर सय्यद यांचा सन्मान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघ यांच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यात आले, यामध्ये सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ॲड.शहानुर अहमद सय्यद यांना सामाजिक कल्याणकारी कार्याचा आढावा घेऊन मिळालेले विविध पुरस्कार तसेच बेस्ट ॲडव्होकेट व नोटरी याबाबत त्यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड 2023 चा स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला.
तसेच डब्ल्यू सी पी ए च्या मानद कायदेशीर सल्लागारपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. हा पुरस्कार सोहळा 23 जुलै रोजी श्रीरामपूर येथील वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघ यांच्या महाराष्ट्र राज्य चाप्टर यांच्यावतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डब्ल्यू सी पी ए चे प्रेसिडेंट प्रा.नरसिंह मूर्ती हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डब्ल्यू सी पी ए चे दुसरे ग्लोबल वोईस प्रेसिडेंट वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ गांधीवादी नेता प्रा.ईपी मेनन, श्रीरामपूर महाराष्ट्र राज्य संपादक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे, समाजसेविका संगीता जामगे आदींनी उपस्थितीना मार्गदर्शन केले.
समाजाच्या चित्रपट तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान पुरस्कार तसेच पाऊस या विषयावरील काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात तसेच श्रीरामपूर येथील साई विठ्ठल अनाथ आश्रमानातील गरीब मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण सुद्धा करण्यात आले. तसेच मंजीत बतरा पर्यावरण पुरस्कृत पर्यावरण पूरक पिशव्यांचे अनावरण करण्यात आले.
वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार सोहळा डब्ल्यू सी पी ए चे उपाध्यक्ष तथा अर्थतज्ञ कायद्याचे अभ्यासक नरसिंह मूर्ती यांनी आपले विचार व्यक्त केले.
व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करून सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी अहमदनगरचे नैमित्त उद्योजक प्रसन्नकुमार धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन डब्ल्यू सीपीए चे महाराष्ट्र चाप्टरचे सचिव ऋषिकेश विघावे यांनी केले.
सदरचा पुरस्कार हा करमाळा तालुक्यातून प्रथमच ॲड.शहानुर सय्यद यांना मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. याबाबत करमाळा वकील संघातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.