दारू पिवून भावाने भावास चाकूने मारले..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दारू पिऊन भावाने भावास चाकूने मारहाण केल्याची घटना (मलवडी) येथे २० ला सकाळी ८ वाजता घडली आहे. या प्रकरणी परमेश्वर भास्कर सुरवसे रा.मलवडी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २० मे ला सकाळी आठ वाजता मी माझ्या घराच्या समोर असताना माझा लहान भाऊ सोमनाथ भास्कर सुरवसे हा दारू पिवून आला व शिव्या देऊन लागला. त्यावेळी अशा शिव्या देऊ नको असे म्हटलो असता त्याने चाकूने माझ्या गालावर मारहाण केली. माझे वडील भास्कर सुरवसे हे सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली आहे. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.