दहावीच्या पेपरनंतर विद्यार्थीनीस नेले पळवून..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३०: दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर १६ वर्षाच्या मुलीस फुस लावून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. हा प्रकार ता. २६ मार्चला दुपारी २ वाजता करमाळा शहरात घडला आहे.
यात या मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. त्यांत त्यांनी म्हटले, की मी करंजे (ता. करमाळा ) येथील / रहिवासी असून माझी मुलगी दहावीला होती. तीचा शेवटचा पेपर २६ मार्चला दुपारी २ वाजता संपला. त्यानंतर ती ३ वाजेपर्यंत घरी येत असते. त्या दिवशी ती परत आलीच नाही. त्यानंतर तीचा सर्वत्र शोध केला परंतू ती नेले आहे. आढळली नाही. त्यामुळे तीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


