जालन्यातील घटनेचे तालुक्यात पडसाद – करमाळा,केम येथे तीव्र निषेध – जेऊर ठेवले बंद

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ करमाळा तालुक्यातील विविध गावात मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. तसेच येत्या ६ सप्टेंबर रोजी करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने करमाळा शहरातील पोथरे नाका ते तहसील कार्यालय असा भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

जेऊर येथे व्यापारी वर्गाने पाळला १००% बंद – जेऊर येथील मराठा समाजाकडून जेऊर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जेऊर व्यापारी वर्गाने व ग्रामस्थांनी जेऊर १००% बंद ठेवले.

जेऊर येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्याने जालन्यातील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते बाळासाहेब तोरमल म्हणाले की झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्यावर कडक कारवाई करण्यात यावी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी.

जेऊर येथील आंदोलनावेळी लसंभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुंजीर यांना जेऊर येथे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अतुल निर्मळ ता. अध्यक्ष सुहास पोळ नाना पोळ पिंटु जाधव अदिनाथ माने बालाजी गावडे सोमनाथ रोकडे दत्तात्रेय आहेरकर मयूर रोकडे आबा झाडे निलेश पाटिल धनु गारुडी शुभम रोकडे राजेश रोकडे महेश शिंदे वैभव मोहिते किशोर कदम नागेश खराडे जय चोपडे हनुमंत अदलिंग किरण गायकवाड शुभम सूर्यवंशी शंकर जाधव गणेश मोहिते संतोष कांबळे अविनाश घाडगे आजिनाथ पांढरमिसे सकल मराठा समाज व असंख्य बहुजन बांधव उपस्थित होते.

करमाळा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करताना

करमाळ्यात मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन – शनिवारी 2 सप्टेंबर रोजी साडेअकराच्या सुमारास करमाळा येथील मराठा समाजाने जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा, जालना घटनेतील जबाबदार पोलिसांना निलंबित करावे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी आंदोलन कर्त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारले. यावेळी मराठा समाजातील अनेक अनेक लोक उपस्थित होते. तसेच आज (दि.३) करमाळा मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने करमाळा येथील देवीचामाळ चौकातील बायपास रोडवरती भव्य रस्ता रोको करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक श्री जोतीराम गुंजवटे व तहसीलदार विजय जाधव यांना निवेदन देण्यात आले.

करमाळा येथे रस्ता रोको आंदोलन करून निवेदन देताना आंदोलन कर्ते
केम येथे आंदोलन करताना

केम येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेचे दहन
जालना जिल्ह्यातील सारोळे येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्याचा निषेधार्ह केम येथील सर्व जाती जमाती ग्रामस्थांचा वतीने “निष्क्रिय मुख्यमंत्री, नपुंसक राज्यसरकार यांचा जाहीर निषेध” अशा शब्दात व मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा असलेले पोस्टर तयार करून त्याचे दहन करून या वेळी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी ए.पी.ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, युवा सेनेचे सागर राजे तळेकर,युवा नेते सागर दौड, पै महावीर आबा तळेकर विष्णू पारखे, विजय ओहोळ, मदन तळेकर बाळासाहेब म्हेत्रे शिवाजी मोळिक, मंगेश तळेकर, बालाजी नागणे, मनोज तळेकर, चंदू बिचितकर, मधुकर गुटाळ, मुलाणी,दिपक,भिताडे,बापुराव जाधव तळेकर आदि उपस्थित होते.

संपादन – सुरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!