‘अहिल्याबाई होळकर’ हिंदुस्थानचा स्वाभिमान – महेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कृतीतून स्वाभिमानाने जगण्याची प्रत्येक स्त्रीला हिम्मत दिली, प्रत्येक व्यक्तीने अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचले तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या जीवनात सुद्धा मार्ग बदल होऊ शकतो शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले.

करमाळा शिवसेनेचे कार्यालयात आज (ता.३१) अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली, यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णा सुपनवर वस्ताद अजिनाथ कोळेकर पत्रकार सचिन जवेरी, दिनेश मडके, नासिर कबीर, अशपाक सय्यद, विशाल घोलप, अशोक मुरूमकर, विशाल परदेशी, हिवरवाडी चे सरपंच राजेंद्र मिरगळ जयवंतराव जगताप युवा मंचचे तालुकाध्यक्ष जयराज चिवटे देवळालीचे चंद्रकांत चव्हाण शाखाप्रमुख मारुती भोसले निलेश चव्हाण आजिनाथ इरकर आदी जण उपस्थित होते.
