पुण्यातील शैक्षणिक संस्थेकडून करमाळा तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत

केम(संजय जाधव): समाजसेवेची परंपरा जपत हडपसर (पुणे) येथील ससाणे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ससाणेनगर यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. ही मदत श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाई नगरी कार्यालयात पोहोचवण्यात आली.

पूरग्रस्त भागातील गरजू नागरिकांसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आणि शिक्षकांकडून दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा साहित्य आणि इतर आवश्यक सामग्री जमा करण्यात आली होती. या उपक्रमासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य चेअरमन अजित ससाणे तसेच संचालक मंडळ सदस्य प्रितम ससाणे, सचिन ससाणे, नितीन ससाणे, निलेश ससाणे, सुधिर ससाणे, राजेंद्र ससाणे, गणेश ससाणे आणि प्रसाद ससाणे यांनी केले.

संकलित वस्तू श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत रामचंद्र दळवी, उपाध्यक्ष सुनंदा प्रमोद दळवी आणि सीए भैरवनाथ चौधरी यांच्या नियोजनानुसार पुरग्रस्त भागातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

या उपक्रमात प्राथमिक विभागाच्या प्राचार्या श्रीया पत्तार, माध्यमिक विभागाच्या प्राचार्या भानुमती नायडू, शिक्षिका सुनंदा दळवी, ज्योती फासगे, स्वाती बधे, सीमा सातव तसेच सेवक गणेश पाटील आणि लक्ष्मण नेटके यांनी समन्वय साधला.
या मदत उपक्रमात विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवून सामाजिक जाणिवेचा आदर्श निर्माण केला आहे.



