अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अजित कणसे यांचा सत्कार संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत स्वाभिमानी शिक्षक पॅनलमधील अजित कणसे हे भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार विवेक येवले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . समितीचे कार्याध्यक्ष अनिल माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर रामचंद्र बोधे यांनी आभार मानले
यावेळी प्रा. नागेश माने यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मोहोळ येथे झालेल्या जिल्हा बैठकीतील इतिवृतांत वाचून दाखविला . यामध्ये त्यांनी समितीचे सभासद करण्यासाठी प्रयत्न करणे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र नोंदणी करणे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे आदि विषयावरती मार्गदर्शन केले. यावेळी -दिगंबर साळुंके ,जेष्ट कवी प्रकाश लावंड ,कवी खलील शेख संतोष माने , बाळासाहेब . दुधे, सुरेश कोळी ,राजेंद्र साने, सुनिल गायकवाड ,डॉ.शिवाजी दळवी डॉ. आप्पासाहेब लांडगे केतन कांबळे ,वैशाली महाजन मेघना कांबळे ,सावित्रा देवकर आदी जण उपस्थीत होते.



