केम येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण कथेचे आयोजन

0
संग्रहित छायाचित्र

केम (संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानचे बंधू घुटकेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

या निमित्त १३ एप्रिल रोजी होमवहन व रुद्राभिषेक होणार आहे. तसेच १४ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत शिवलीला अमृत पारायण, तर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.



या कार्यक्रमात कथाकार ह.भ.प. गणेश बर्डे महाराज (आळंदी) यांचे मार्गदर्शन लाभणार असून, साथसंगत म्हणून ह.भ.प. संदीप नरके महाराज (तबला) व ह.भ.प. बळीराम गिरी महाराज (सिंथ) सहभागी होणार आहेत.



सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार असून, हे कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. विनोद रोकडे महाराज (झी टॉकीज फेम) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टी होऊन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याचा लाभ केम व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी केम, भोगेवाडी व पाथुडी येथील भाविक परिश्रम घेत आहेत.

घुटकेश्वर देवस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!