खडकी येथे ४ ऑक्टोबरपासून अखंड हरिनाम सप्ताह

करमाळा , ता.29: खडकी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ४ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह जामखेड येथील हरिभक्तपरायण महादेव महाराज रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकार आपली कीर्तन सेवा सादर करणार आहेत. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये हिंगोलीचे ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री, आळंदी देवाची येथील ह.भ.प. आजिनाथ महाराज लाड, नातेपुतेचे ह.भ.प. सागर महाराज बोराटे (राष्ट्रीय शिवशंभो व्याख्याते), धारूरचे भागवताचार्य प्रकाश महाराज साठे, मुक्ताईनगरचे ह.भ.प. विशाल महाराज खोले, जेऊर हैबती येथील ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांचा समावेश आहे. तर काल्याचे कीर्तन ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांचे होणार आहे.

प्रवचनकार म्हणून ह.भ.प. रावसाहेब महाराज काटकर, ह.भ.प. गायकवाड महाराज निलज, ह.भ.प. अनिताताई शिंदे महाराज (खडकी), ह.भ.प. करळे महाराज कामुने, ह.भ.प. महादेव महाराज रासकर (जामखेड), ह.भ.प. प्रतीताई महाराज सरोदे (खडकी) तसेच ह.भ.प. सुखदेव महाराज कुंभार हे करणार आहेत. यास सप्ताहानिमित्त ग्रामस्थांनी संपूर्ण आठवडाभर भक्तांसाठी दुपारच्या जेवणाची, नाश्त्याची व सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. या पवित्र सप्ताहाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन खडकी ग्रामस्थांनी केले आहे.





