बिटरगाव श्री येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

करमाळा, ता.25: बिटरगाव (श्री) येथे काल ता.24 ऑक्टोबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला आहे. हा सप्ताह जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे.


व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. नानामहाराज पठाडे आहेत. या सप्ताहामध्ये ह.भ.प.ॲड. शंकर महाराज शेवाळे, समाधान महाराज शर्मा ,अनिल महाराज सुपे विशाल महाराज खोले, सोपान महाराज शास्त्री, माऊली महाराज पठाडे तसेच केशव महाराज उखळीकर या मान्यवरांची कीर्तने ठेवण्यात आलेले आहे. याबरोबरच विलास महाराज जाधव , प्राची सरोदे, डॉक्टर बाबुराव हिरडे, तुळशीराम काळे ,हनुमंत महाराज करळे व प्रदीप महाराज ढेरे यांची प्रवचने ठेवण्यात आलेली आहेत. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अभिजीत मुरूमकर यांनी दिली आहे.





