भैरवनाथ जन्मोत्सवनिमित्त केम येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम येथील थोरल्या वाड्यातील भैरवनाथ मंदिरात जन्मोत्सव निमित्त दि ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर या दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सुरूवात श्रीस अभिषेक करून झाली. या सप्ताहात ह.भ.प. निंबाळकर, ह.भ.प.वनिता पाटील (मुंबई झी टॉकीज फेम), ह.भ.प. नानासाहेब चोपडे यांची कीर्तने झाली.
भैरवनाथ जन्मोत्सव कीर्तनाची सेवा ह.भ.प. वनिता पाटील यांचे १० ते १२ वेळेत झाली. बरोबर १२ वा ५ मि. जन्म झाल्यावर मंदिरात गुलालाची उधळण करीत पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महिलानी व ह.भ.प. मारूती पळसकर व बंडू तळेकर यांनी सुंदर पाळणा म्हटला. या जन्मादिवशी पुणे येथील उद्योग पती आजीनाथ लोकरे यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस मोठया थाटामाटात साजरा केला. या निमीत्ताने मंदिरात दिवसभर मिष्ठान्न भोजनाची सोय करण्यात आली. याचा हजोरो भाविकांनी लाभ घेतला. तसेच या सप्ताहाची सांगता कालच्या कीर्तनाने झाली. या मध्ये बुधवार दि ६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२.३० पर्यत ह.भ.प. नाना महाराज चोपडे यांचे कीर्तन झाले त्यानंतर दहिहंडी फोडून काल्याचा प्रसादाचे वाटप केले या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. या सप्ताहासाठी मंदिराचे पुजारी सोपान तळेकर व भैरवनाथ मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.