गोकुळाष्टमीनिमित्त केम येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

केम (संजय जाधव) – सालाबाद प्रमाणे गोकूळष्टामी निमित्त केम (ता.करमाळा) येथील श्री राम मंदिरामध्ये दि २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक मधु नाना तळेकर यांनी दिली.
या सप्ताहामध्ये दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होणार. या मध्ये पहाटे ४ ते ६ काकडा ८:३० ते १२:३० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांयकाळी ६ ते ७ हरिपाठ ९ ते ११ कीर्तन त्यानंतर हरिजागर होणार आहे.
यामध्ये ह.भ.प. अभिमून्य पाटिल महाराज सोलापूर,
ह.भ.प. भोसले महाराथ कुंभारगाव, ह.भ.प. स्वप्नील महाराज पाथुडीं, ह.भ.प. विजयाताई पंडित पेडगाव
ह.भ.प. काळदाते महराज करमाळा, ह.भ.प.प्राजंलीताई ब्रेंद्रे केम, ह.भ.प.सुरेश थिटे महाराज केम तर कृष्ण जन्माचे कीर्तन ह.भ.प सुधीर वालवडकर यांचे १० ते १२ या वेळेत होईल.
त्यानंतर महाप्रसादाचे वाटप या मध्ये मृदंगाचार्य शुभम महाराज मलकापुर, नारायण टोंपे, यम टोंपे केम, हार्मोनियम साथ ज्ञानेश्वर दिक्षीत, उत्तरैश्वर तळेकर,उत्तम जाधव, हरिदास तळेकर गायनाचार्य रमेश तळेकर महाराज आदी जणांची साथ किर्तनाला असणार आहे.
केम व परिसरातील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घैवा असे आवाहान श्री राम भजनिबमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.



