महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अक्षय काळे राज्यात प्रथम..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत ऑक्टोबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये करमाळा शिवसेना उपशहरप्रमुख राजाभाऊ काळे यांचा पुतण्या अक्षय ईश्वर काळे ( ह. रा. सूर्डी, ता. बार्शी) या तरुणाने यशाला गवसणी घातली आहे. त्याची राज्य करनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
तसेच सहाय्यक कक्ष प्रमुख मंत्रालय यात तो राज्यात पहिला आला आहे. अक्षय काळे यांच्या यशामुळे सुर्डी येथे व करमाळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला. मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अक्षय काळे यांचे वडील ईश्वर काळे हे महावितरण मध्ये प्रिन्सिपल ऑपरेटर पदावर माढा येथे कार्यरत आहेत. अक्षय याचे पहिली ते दहावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय करमाळा व दिलीपराव सोपल विद्यालय बार्शी, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट ॲन्ड सायन्स सोलापूर येथे झाले आहे.
त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे. परीक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांचे आजोबा कै. मच्छिंद्र काळे यांच्याकडून घेतली. त्यांचे आजोबा ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. अक्षय यांचे लहान बंधू अजय काळे आयआयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर कार्यरत आहे.
राज्य कर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल करमाळा शिवसेना उपशहरप्रमुख राजाभाऊ काळे यांनी करमाळा येथे त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांच्यासह परिवारा तर्फे पेढे वाटून आनंद साजरा केला होता.