भाळवणी येथे २ लाख ४० हजार रू. किंमतीचे दारू रसायन व अन्य साहित्य करमाळा पोलिसांकडून जप्त.. - Saptahik Sandesh

भाळवणी येथे २ लाख ४० हजार रू. किंमतीचे दारू रसायन व अन्य साहित्य करमाळा पोलिसांकडून जप्त..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : भाळवणी येथे दारू रसायन व अन्य साहित्य २ लाख ४० हजार रू. किंमतीचे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांवर कारवाई केली आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल सुनील गणेश जतकर यांनी फिर्याद दिली.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की भाळवणी येथे रेल्वे लाईन लगत काही लोकं हातभट्टी दारू करत असल्याची माहिती मिळाली असता, तेथे दत्तू सोपान काळे याच्याकडे एक लोखंडी बॅरल हातभट्टी दारू करण्याचे रसायन तसेच दोन निळ्या रंगाचे प्लॅस्टीकचे गुळमिश्रीत रसायन भरलेले बॅरल तसेच ५ लिटर हातभट्टी दारू असे एकूण ६०० लिटर रसायन ३१ हजार ५५० रूपयाचे तर त्यापुढे लक्ष्मी सोपान काळे हिचेकडे ३१ हजार ९०० रूपयाची ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन व १० लिटर हातभट्टी दारू सापडली आहे. त्यानंतर मच्छिंद्र सोपान काळे याचेकडे ९३ हजार ४०० रूपयाची १८०० लिटर दारू रसायन सापडले आहे. तर राजेंद्र सोपान काळे याचेकडे ८३ हजार २०० रू. चे १६०० लिटर गुळमिश्रीत रसायन सापडले आहे.

अशाप्रकारे १३ मार्चला दुपारी पावणेबाराच्या सुमारास या सर्वांकडे एकूण २ लाख ४० हजार रूपयाचे रसायन, चार लोखंडी बॅरल, १५ प्लॅस्टीकचे २०० लिटरचे बॅरल, ८ शंभर लिटरचे प्लॅस्टीकचे बॅरल असा माल सापडला आहे. अलिकडच्या काळातील पोलीसांनी ही मोठी कारवाई आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले, पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव, महंमद शेख, हवालदार प्रशांत सुरवसे, सर्व जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर तसेच सोलापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक टिळेकर, हवालदार बाळ सराफ, पोलीस नाईक पवार, चालक पोलीस कॉन्स्टेबल शिंदे अशा सर्वांच्या पथकाने केली आहे. पोलीसांच्या या कारवाईबद्दल नागरीकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!