मलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केला प्रहार संघटनेत प्रवेश - Saptahik Sandesh

मलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केला प्रहार संघटनेत प्रवेश

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – मलवडी (ता.करमाळा) गावाच्या सरपंच बायडाबाई सातव, उपसरपंच साहेबराव दुर्गुळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर पॅनल प्रमुख गणेश कोंडलकर या सर्वांनी काल (दि.५) रोजी माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे.

तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांकडून मलवडी गावाच्या वीज-रस्ते,पाणी, स्मशानभूमी, व्यायाम शाळा, आरोग्य सुविधा,दहिगाव उपसा सिंचन योजनच्या पाण्याचा प्रश्न , कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, उसाच्या एफ आर पी चा प्रश्न यासारखे अनेक प्रश्न सोडविले गेले नसल्याने सरपंचासह इतरांनी प्रहार मध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील जिल्हाउपाध्यक्ष रमेश पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, संपर्कप्रमुख जमीर भाई शेख कार्याध्यक्ष खालील भाई मणियार,तालुकाध्यक्ष संदीप तळेकर,तालुका संघटक नामदेव पालवे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव आदीजन उपस्थित होते.

अनेक पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार मध्ये झाले सामील – मलवडी गावचे लताबाई नागनाथ कोंडलकर ग्रामपंचायत सदस्य पप्पू वामन कोळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा प्रमोद कोंडलकर माजी सरपंच गणेश कोंडलकर कार्याध्यक्ष सोलापूर युवा आघाडी जिल्हा पदी निवड नाना शिंदे, सतीश जाधव, बाबासाहेब कोळी ,बापूराव पालवे ,रवी कोळी, शंकर को, विजय शिंदे ,नामदेव माळी, शिवाजी जाधव, अमोल जाधव, दादा पालवे ,सतीश कोंडलकर ,विशाल कोंडलकर, रमेश कोंडलकर, रामेश्वर कुंडलकर, नागेश कोळी, किसन कोळी, विशाल जाधव, गणेश जाधव, बाळू जाधव,असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार मध्ये सामील झाले.

प्रस्थापित नेत्यांना प्रश्न सोडविता न आल्याने अनेक लोक प्रहार मध्ये सामिल होत आहेत. येत्या पंधरा दिवसात अजून तीन ग्रामपंचायती प्रहार मध्ये दाखल झालेले चित्र आपल्या सर्वांना बघायला मिळेल.

दत्ताभाऊ मस्के पाटील ( जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष )

मलवडी गावचा विकास पूर्णपणे थांबलेला असून तालुक्यातील एकही नेता मतं मागण्याच्या पलीकडे आमच्या गावात येत नाही गावातील तरुण पिढी दारूमुळे बरबाद व्हायला लागली आहे दारूच्या भट्ट्या गावात राजरसपणे सुरू आहेत लोकांचे अनेक प्रश्न आ वासून बसले आहेत आणि यासाठी गावच्या विकासासाठी आम्ही प्रहारला साद घातली आहे.

बायडाबाई सातव ( सरपंच, मलवडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!