केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात- १५ क्विंटल शिधा वाटप

केम(संजय जाधव): सीना नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावातील नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. या संकट काळात ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट, केम तसेच बिचितकर परिवार, केम यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.



ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टने एकूण १५ क्विंटल शिधा वाटप करत १४७ किट पूरग्रस्तांना दिले. पापनस येथे ७३ किट, म्हैसगाव येथील ग्रामस्थांना ३४ किट वाटप केले. तसेच लहू येथे २० किट वाटप करण्यात आले. म्हैसगाव येथील ग्रामस्थ चिंचगाव टेकडीवर विस्थापित झाले असून त्यांना तिथेच किटचे वाटप करण्यात आले. प्रत्येक किटमध्ये ५ कि. आटा, ४ कि. तांदूळ, १ कि. तूर डाळ, दीड कि. साखर व चहा पावडर असे मिळून १३ किलो शिधा होता. या उपक्रमात चेअरमन दादा गोडसे, सचिव मनोज सोलापूरे, सदस्य मोहन दौंड, विजय बप्पा तळेकर, राजेंद्र दौंड, दाऊद शेख, भैरू शिंदे, निलेश पाटील, संतोष राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

बिचितकर परिवाराकडून ३०० फराळाचे किट वाटप :
दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त बिचितकर परिवाराच्या वतीने मुंगसी व शिंदेवाडी येथील पूरग्रस्तांना ३०० फराळाचे किट व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. या वेळी माजी सरपंच बाळासाहेब बिचितकर, रामदास, धनंजय, मयुर, संजय, मोहन, विशाल, हरिदास, सागर, नितीन, श्रीकांत, माऊली, गणेश, विलास, किरण बिचितकर यांच्यासह ऊत्तरेश्वर पप्पू तळेकर, काका चव्हाण आदी उपस्थित होते.

या मदत उपक्रमांचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी कौतुक केले असून केम व परिसरातील नागरिकांकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.



