करमाळा येथे घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप

करमाळा(दि.२५): पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-2 मध्ये राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, बाल विकास अधिकारी किरण सुर्यवंशी आदीजन उपस्थित होते.





