अल्ताफशेठ तांबोळी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जय महाराष्ट्र पतसंस्थेचे चेअरमन, श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे संचालक व माजी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
अल्ताफशेठ तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना डॉ. अमोल डुकरे यांचे हस्ते फळे वाटप करण्यात आले. यावेळी अमीरशेठ तांबोळी, फारूक जमादार, हाजी फारूक बेग, समीर शेख, सद्दाम शेख, विनोद महानवर, साहिल वस्ताद, किरण शिंदे, ढाकणे सिस्टर, पठाण सिस्टर, रायपुरकर आदीजण उपस्थित होते. उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक संजय सावंत यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, जमीर सय्यद, आनंद रोडे, वाजीद शेख, नागेश उबाळे, मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर उपस्थित होते. वाढदिवसा निमित्त जय महाराष्ट्र मित्र मंडळ व टायगर ग्रुपच्या वतीने अल्ताफशेठ तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. –
कमलादेवी औद्योगिक वसाहत येथे सायंकाळी सात वाजता तांबोळी मित्र परिवाराच्या वतीने अल्ताफशेठ तांबोळी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत, प्रशांत ढाळे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, सचिन घोलप, शिवसेना शहरप्रमुख प्रविण कटारिया, आदिनाथचे माजी चेअरमन संतोष पाटील, संजय शिंदे, दिनेश भांडवलकर, नितीन घोलप, सुनील बनसोडे, पांडूरंग जाधव, हाफीज कुरेशी, बाळासाहेब इंदुरे, संतोष गानबोटे, संतोष वारे, पिंटूशेठ गुगळे, ॲड. कमलाकर वीर, राजेंद्र चिवटे, राजेंद्र घाडगे यांच्यासह सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते