फिरते विज्ञान केंद्र हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी दिशादर्शक- अमरजित साळुंके - Saptahik Sandesh

फिरते विज्ञान केंद्र हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी दिशादर्शक- अमरजित साळुंके

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेतून,नेहरू विज्ञान केंद्र मुंबई व शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने व भाजपा नेते मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांचे माध्यामातून विज्ञान प्रदर्शन बसचे आयोजन करण्यात आले आहे.


याचा लाभ आता ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. राजेश्वर विद्यालय, राजुरी ता.करमाळा येथे विज्ञान बस आली असता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अमरजित साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. एस. झोळ यांनी सर्वांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना श्री. साळुंके म्हणाले की, करमाळा,माढा, माळशिरस, सांगोला, माण, या तालुक्यामधील १०० विद्यालय व जवळपास ३० हजार विद्यर्थ्यांना या फिरत्या विज्ञान प्रदर्शन चा लाभ भेटणार आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील २३ विद्यालयांचा समावेश आहे. भारत देश हा विविध पातळीवर विकसित व स्वयंपूर्ण बनत असताना विद्यार्थांना सायन्स शो, टेलिस्कोप या सारख्या विज्ञाननिष्ठ गोष्टी शिकण्यास मिळत आहे, तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे.


यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवून माहिती घेतली. याप्रसंगी सरपंच राजेंद्र भोसले, माजी सरपंच आबासाहेब टापरे, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्र ठाकुर, पंचायतराज चे शिवराज जाधव, अभिजित पाटील यांचेसह प्रशालेतील श्री.डी.एस.साखरे सर, श्री.एम.एस.साखरे, श्री.कोल्हे सर, श्री.वाघमोडे, श्री.तळेकर सर, श्री.अवघडे सर, श्री.गरड सर, श्रीमती कोल्हे, श्री.बागडे श्री.खाडे यांचेसह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रशालेला फिरती प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे विद्यालयाच्या वतीने श्री.डी.एस.साखरे यांनी आभार व मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!