यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील ‘अमृतकलश’ माती संकलनासाठी सज्ज..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतरावचव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर च्या वतीने ‘आजादी का अमृत महोत्सव ‘अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या मोहिमे अंतर्गत माती संकलनासाठी अमृत कलश तयार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील,उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी, सीमेवर लढणाऱ्या वीरांचा व निवृत्त वीरांचा सन्मान करण्यासाठी आणि मातृभूमीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ‘मेरी मिट्टी मेरा देश ‘हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे यानिमित्ताने महाविद्यालयातही ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत माती संकलनासाठी अतिशय सुंदर असा अमृत कलश तयार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या गावची मूठभर माती आणून या अमृत कलशामध्ये संकलित केली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील,उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या हस्ते अमृत कलशाचे पूजन करण्यात आले तेव्हा सर्व मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते या अमृतकलशामध्ये मातीचे संकलन करण्यात आले.
यावेळी प्रा. हनुमंत भोंग,प्रा.जयंत भांगे, प्रा. दिलीप जाधव,प्रा.सुवर्णा कांबळे,प्रा. पल्लवी टोणपे, प्रा.अडसूळ प्रा.रूपाली साळुंखे, योगेश शिंपी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख,प्रा. सुजाता भोरे यांनी परिश्रम घेतले.