मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात प्रौढाचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात ५३ वर्षाच्या प्रौढाचे उपचार चालू असताना निधन झाले आहे. हा प्रकार जातेगाव येथे घडला असून मोटारसायकलस्वार खरवंडी, ता.नेवासा, जि.अहमदनगर येथील आहेत. यात पोलीस हवालदार बालाजी केशव घोरपडे यांनी करमाळा पोलीस स्टेशनला भेट दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की भास्कर गंगाधर मुरकुटे ( वय – ५३, रा. खरवंडी, ता.नेवासा, जि.अहमदनगर ते स्वतः मोटारसायकल क्र. एमएच १७ सीझेड ८१३५ ही स्वतः चालवत पंढरपूरला गेले होते. व पंढरपूरवरून परत येत असताना १३ मार्च २०२४ रोजी रात्री दहा वाजता जातेगाव येथे आले असताना मोटारसायकल घसरून पडले. त्यांचेवर उपचार चालू असताना २१ मार्च २०२४ रोजी त्यांचे उपचार चालू असताना निधन झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी मयत मुरकुटे यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!