केम परिसरात दोन दिवस ड्रोनच्या घिरटया - नागरिकांत भीतीचे वातावरण - Saptahik Sandesh

केम परिसरात दोन दिवस ड्रोनच्या घिरटया – नागरिकांत भीतीचे वातावरण

संग्रहित छायाचित्र

केम (संजय जाधव) –  केम परिसरात गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या दहाच्या सुमारास ड्रोन आकाशात घिरटया घालत असल्याचे पाहिल्याने नागरिकांची व शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनमुळे अनेक तर्क वितर्क लढविले जात असून अनेक मोठया अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांकडू  बोलले जात आहे. या  पोलीसांनी त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

करमाळा तालुक्यात गेल्या महिन्यापासून काही गावात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनमुळे अनेकांची डोके दुखी वाढली आहे. अशाच प्रकारे फिरणारा ड्रोन केम परिसरातील पाथुर्डी, घुटकेश्वर,भोगेवाडी, ढवळस, केम शिवार, बाराबाई वस्ती, देवकर वस्ती या परिसरात रात्री ९ ते १० च्या सुमारास ड्रोन फिरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

डो्नच्या साहाय्याने परिसराची पाहणी करून मोठया चोऱ्या होण्याची संभवता असल्याची अफवा केम परिसरा पसरली आहे. अचानक पणे रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पठाडे शिवारातील बिचितकर वस्तीवरील तरुणांनी वस्तीच्या संरक्षणासाठी रात्रभर जागरण केले असल्याची माहिती दत्तात्रय बिचितकर यांनी सांगितली.  पोलिसांनी सदर घटनेचा योग्य तो तपास करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!