आठ वर्षांचा मुलाला व नऊ वर्षांची मुलीला पळविले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : शेलगाव (वांगी) येथील घरासमोर खेळत असणाऱ्या आठ व नऊ वर्षाच्या मुलांना अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. हा प्रकार २१ जुनला सकाळी अकराच्या सुमारास शेलगाव (वांगी) येथे घडला आहे. या प्रकरणी किरण उर्फ इऱ्या भोसले (रा. शेलगाव वांगी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की २१ जुनला माझा आठ वर्षाचा मुलगा व माझी नऊ वर्षाची भाच्ची ते दोघे घराजवळ खेळत होते. त्यानंतर ते घरी आलेच नाही. शोध घेतला असता त्यांचा शोध लागला नाही. त्यांना कोणीतरी पळवून नेले आहे याची खात्री पटली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.




