केम येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भरविण्यात आले प्रदर्शन

केम (संजय जाधव) – केम येथील स्वराज्य मर्दानी खेळ या संस्थेच्या वतीने नूतन माध्यमिक विद्यालय व प्राथमिक आश्रम शाळेत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन प्रसंगी तळेकर म्हणाले की, केम येथील स्वराज्यमर्दानी खेळाचे संस्थापक अक्षय तळेकर यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे जे प्रदर्शन भरवले आहे हा अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम आहे. शासनाने अशा संस्थेला अनुदान देऊन असे प्रदर्शन प्रत्येक शाळेत भरवण्यात यावे असा देखील विचार त्यांनी यावेळी मांडला.

या शस्त्र प्रदर्शानासाठी इतिहास कालिन शस्त्र, काही बनावटी शस्त्र, शिवकालीन नाणी, इंग्रज काळातील नाणी ठेवण्यात आली. या मुळे विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्राची माहिती झाली.
या प्रदर्शनाचा लाभ नूतन माध्यमिक व प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला. संस्थेच्या वतीने काका तळेकर यांनी स्वराज्य मर्दानी खेळ या संस्थेचे अध्यक्ष अक्षय तळेकर, यांचा सन्मान केला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ह,भ,प, वाघमोडे सर यानी केले तर आभार काळे सर यानी मानले. या वेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



