केम येथे भरविण्यात आले  शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

0

केम (संजय जाधव) –  केम येथे सीमोल्लंघना निमित्त या वर्षी प्रथमच श्री उत्तरेश्वर रक्तदाते संघटना व स्वराज्य मर्दानी खेळ यांच्या संयुक्त विद्दमाने शिवकालीन शस्त्र प्रर्दशन भरविण्यात आले. याचे उदघाटन कुंकू कारखानदार राजेंद्र गोडसे व मंहंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतला.

केम येथील विकासनगर माळावर सोने लुटण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर ,खंडोबा व मठातील देवीची पालखी  सीमोल्लंघनासाठी आणली जाते त्यानिमित्ताने येथे शिवकालीन शस्त्र प्रर्दशन भरविण्यात आले. या वेळी संस्थापक अक्षय तळेकर यांनी शस्त्राची माहिती सांगितली. या प्रर्दशनासाठी भैरू तळेकर, दत्तात्रय कुलकणीं बाळासाहेब साखरे , बाळासाहेब गुरव,आणा मोरे यानी परिश्रम घेतले तसेच या खेळातील रणरागिणी यांच्या पालकांचा उत्तरेश्वर रक्तदाते संघटना यांच्या वतीने सन्माण करण्यात आला. तसेच या वर्षीं बैलगाडा शर्यत आयोजीत केली होती. या मध्ये केम येथील सागर भाऊ पवार यांच्या सोन्या बैलाला पळायला जोड नव्हती. त्यामुळे सोन्या बैलाने हि शर्यत जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!