उत्तरेश्वरबाबास देण्यात आला ५६ भोगीचा नैवेद्य - Saptahik Sandesh

उत्तरेश्वरबाबास देण्यात आला ५६ भोगीचा नैवेद्य

केम (संजय जाधव) : येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानच्या अन्नछत्रचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या ऊत्साहात साजरा झाला. या निमीत्त ५६ भोगीचा नैवेद्य श्रीस दाखवण्यात आला. या मध्ये सु्वासिनीने वेगवेगळे पदार्थ आणले ह़ोते. हा नैवद्य भाविकांचे लक्ष वेधून घेत ह़ोते.

यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी ७ वा श्रीस अभिषेक ८ ते १० सामुदायिक सत्यनारायण महापुजा या पुजेसाठी एकूण २१ जोडपे सहभागी झाले होते. तसेच १० ते १२या वेळेत ह.भ.प. रविंद्र परेराव महाराज सोयेगाव यांचे कीर्तन झाले याना ह.भ.प. सौ प्रांजली ताई बेंद्रे व गायक रमेश तळेकर यांनी साथ दिली तसेच तबला वादक नारायण टोंपे होते कीर्तन झाल्यावर सत्यनारायणाची उत्तर पुजा करण्यात आली त्यानंतर या कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान कमिटी व उत्तरेश्वर रक्तदाते संघटना ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!