पोंधवडीच्या यात्रेत चौघाकडून वृध्दास मारहाण... -

पोंधवडीच्या यात्रेत चौघाकडून वृध्दास मारहाण…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : पोंधवडी येथील हनुमान जयंतीच्या यात्रेत चौघांनी वृध्दास मारहाण केली आहे. हा प्रकार ६ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता घडला आहे. या प्रकरणी सुशा कोंडीबा काळे (वय-६२ रा. पोंधवडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की) ६ एप्रिलला पोंधवडी येथे हनुमान जंतीनिमित्त अलसेल्या यात्रेत गेलो असता तेथे पोफळज येथील राहूल अंकुश काळे, मिथुन संग्राम भोसले, मैनी संग्राम भोसले व कामल अंकुश काळे हे आले होते. या यात्रेत तुम्ही काही चोरी करू नका असे मी त्यांना समजावून सांगितले असता त्यांनी दगडाने मला मारहाण करून जखमी केले आहे. तसेच माझी मुलगी व पुतण्या हे सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!