श्रीशंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळ्यात केम येथील शिवशंभू भक्तांना सेवेची संधी
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड समिती १६ जानेवारी २०२४ साठी ची विभागीय बैठक श्रीराम मंदिर केम ता. करमाळा येथे पार पडली. यावेळी समितीचे प्रमुख सिध्दार्थ दादा शेलार व अभिजीत तळेकर उपस्थित होते.
या बैठकीत छत्रपती शंभू महाराज राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड १६ जानेवारी या सोहळ्यात समाधी स्थळी पूर्णवेळ सजावट सेवा करण्याची जबाबदारी केम येथील समस्त शिवभक्तांना देण्यात आली. केम साठी हा एक आनंदाचा क्षण आहे अशी भावना केम येथील शिवभक्तांची आहे. बैठक झाल्यानंतर समितीचे प्रमुख सिध्दार्थ दादा शेलार यांचा सन्मान श्रीहरी तळेकर यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी अभिजित तळेकर, समीर दादा तळेकर, गौरव नाईकनवरे, विशाल ओहोळ, मनोज तळेकर, निलेश पाटील,महेश गायकवाड, सचिन तळेकर,ज्ञानेश्वर तळेकर, अक्षय तळेकर, बापू वायभासे,राजाभाऊ तळेकर, दिनेश गायकवाड, महेश तळेकर, आबा दुर्गुळे ,शुभम मारवाडी यासह केम येथील शिवशंभुभक्त उपस्थित होते