“आनंद घरामध्येच आहे, तो शोधला पाहिजे – संजय कळमकर” -

“आनंद घरामध्येच आहे, तो शोधला पाहिजे – संजय कळमकर”

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.31:“आनंद हा दूरवर कुठे नसून, तो आपल्या घरामध्ये, आपल्या जवळच असतो; परंतु आपण तो शोधत नाही. त्यामुळे आनंदाऐवजी दुःख आपल्या पदरात पडते. खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर ज्ञान, विचार आणि वाचन यांची आवश्यकता आहे.  त्यासाठी प्रत्येक घरामध्ये पुस्तके असली पाहिजेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी केले.

“सर्वोदय प्रतिष्ठान “आयोजित करमाळा येथील बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे होते.

कळमकर पुढे म्हणाले, “आपल्याकडे सुखाची साधने आहेत, पण समाधान नाही. मोठी  गादी आहे पण झोप नाही, पंच पक्वान्नाचे ताट आहे पण भूक नाही. हाती पुष्कळ साधनं असूनही त्यांचा उपभोग घेता येत नाही. दुसऱ्याचा हव्यास करणे, आपल्या जवळचं न आवडणे, यामुळे दुःख निर्माण होते.मोबाईलच्या आहारी गेलेल्या जीवनात परिवाराशी संवाद संपत चालला आहे. खरा आनंद हा परिवारातच आहे, पण आपण तो गमावतोय. जुन्या संकल्पना समजून घेतल्या, घरामध्ये संवाद वाढवला तरच सुख-आनंद लाभू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. घुमरे यांनी युवा पिढीने स्वतःच्या पायावर उभे राहीले पाहिजे, असे अवाहन करत “सर्वोदय व्याख्यानमालेचे” कौतुक केले.करमाळा शहरात हीच एकमेव व्याख्यानमाला सुरू आहे. ही मोठ्या जोमाने चालवा,अवश्य ती मदत करू असे आश्वासन दिले.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक अजित कणसे यांनी केले .उपस्थितांचे सत्कार महेश पायघन व वैभव पोतदार यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विष्णू शिंदे यांनी मानले.

या वेळी , प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील,विद्या विकास म्डळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण, अमर साळुंखे,  यांच्यासह ॲड. दत्तात्रय सोनवणे, सचिन पिसाळ, कवी खलील शेख, साहित्यिक भीष्माचार्य चांदणे, डॉ. आप्पासाहेब लांडगे, दिगंबरराव साळुंखे, पत्रकार गजेंद्र पोळ, उद्योजक वैभव पोळ आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!