करमाळा येथील क्रिकेट स्पर्धेत आनंदकर वॉरीयर्स संघ विजयी
करमाळा(दि.३): येथील गजानन क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना काल रविवारी(दि.२) संपन्न झाला. हा सामना गजानन क्रिकेट क्लब करमाळा विरुद्ध ॲड. शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर यांच्यात झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत अहिल्यानगरच्या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १ लाख रुपये व चषक पटकावले तर द्वितीय पारितोषिक आयोजक गजानन क्रिकेट क्लब करमाळा यांनी ७५ हजार रुपये रोख रक्कम व चषक पटकावले. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मॉर्निंग क्रिकेट क्लब टेंभुर्णी तसेच चौथ्या क्रमांकाचे बक्षीस केसीसी क्रिकेट क्लब केम यांनी पटकाविले.
करमाळा येथील गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब यांच्या वतीने दिनांक 29 जानेवारी ते दोन फेब्रुवारी यादरम्यान या करमाळा येथील जीन मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये करमाळा तालुक्यासह महाराष्ट्रातून विविध संघांनी सहभाग घेतला होता. या सर्व सामन्यांची युट्युब वर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार राहुल यास मिळाला. तो मालिकावीर देखील ठरला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सचिन गायकवाड यास पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार वितरणावेळी आयोजक गजानन सोशल व स्पोर्टस क्लबचे प्रशांत ढाळे, रविंद्र वळेकर, सचिन घोलप, संजय सावंत, अतुल फंड उपस्थित होते.े