करमाळा तालुक्यातील अनिकेत मेनकुदळे याची NIT रायपूरमध्ये निवड – सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

करमाळा /संदेश प्रतिनिधी : वांगी 3 येथील अनिकेत दीपक मेनकुदळे याने अभूतपूर्व यश मिळवत प्रतिष्ठेच्या एनआयटी रायपूर (छत्तीसगड) येथे कम्प्युटर सायन्स शाखेसाठी प्रवेश मिळवला आहे. देशभरातून सुमारे 14 लाख विद्यार्थी सहभागी झालेल्या जेईई (मुख्य) परीक्षेत अनिकेतने 5794 वा क्रमांक मिळवत यशाची नवी शिखरे गाठली आहेत. या यशामुळे करमाळा तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
अनिकेतचे वडील दीपक मेनकुदळे हे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. अनिकेतने आपले प्राथमिक शिक्षण भारत हायस्कूल जेऊर येथे तर माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षणासाठी त्याने राजस्थानातील कोटा येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेत बारावी सीबीएससीमध्ये 88.50% गुण मिळवले. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून तसेच शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून अनिकेतचे अभिनंदन व कौतुक होत आहे.



