फिसरे गावचे सुपुत्र अनिल दौंडे यांची उपजिल्हाधिकारीपदी बढती..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : फिसरे (ता.करमाळा) येथील अनिल वसंत दौंडे यांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने बढती झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. अनिल दौंडे हे फिसरे गावचे रहिवाशी आहेत.

शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. गरीब परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सुरूवातीस ते साडे येथे इंदिरानगर भागात जि.प.शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी तीन वेळा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची परीक्षात देवून उत्तीर्ण झाले होते. परंतू ती नोकरी त्यांनी स्वीकारली नाही. अधिकारी होण्याचे त्यांचे ध्येय होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून तहसीलदार म्हणून निवड झाली. तहसीलदार म्हणून प्रथम धुळे, नाशिक येथे काम केले. उपजिल्हाधिकारी बढती पदोन्नतीने मिळाली आहे. श्री. दौंडे यांनी पाहिलेले स्वप्नं त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण केले आहे. दौंडे यांचे या यशाबद्दल त्यांचे फिसरे ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार होणार आहे.