अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला तालुकाध्यक्षपदी अनिता राऊत यांची निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय किशोर माळी जिल्हा उपाध्यक्ष दिपक ढगे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जाधव यांच्याकडून आनिता राऊत यांना निवडीचे पत्र देऊन सन्मानित केले. सौ.निशिगंधा शेंडे यांची महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सुरेश भानवसे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, दिपक ढगे, (बार्शी), ज्ञानेश्वर सातव, राजेंद्र मोहोळकर, दत्ता दिवटे व शितलताई करे पाटील, स्वातीताई माने, अरुणा जाधव, जयश्री माने,श्रीम.कविता चांदणे, स्वातीताई मोहोळकर सौ.साठे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी किशोर माळी यांनी समता परिषदेची सर्व रुपरेषा व कर्तव्य समजावून सांगितली.श्री.करे-पाटील यांनी फुले दांपत्यांनी सामाजिक व शैक्षणिक यासाठी दिलेले योगदान याबद्दल मार्गदर्शन केले. जगन्नाथ जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तसेच सदर निवडीसाठी श्री.जाधव यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी विक्रम राऊत यांनी आभार मानले..