चिखलठाण येथील न्यू इरा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन “अंकुर-2025” उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : न्यू इरा पब्लिक स्कूल चिखलठाण चे वार्षिक स्नेह संमेलन “अंकुर-2025″अत्यंत जल्लोष पूर्ण व नयनरम्य वातावरणात साजरा झाला.या कार्यक्रमाचे सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी करमाळा – माढा मतदार संघाचे आमदार श्री. नारायण आबा पाटील ,सरपंच सौ . धनश्री विकास गलांडे,राजाभाऊ बारकुंड (मा.उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर), विकास गलांडे (चेअरमन सोसायटी),चंद्रकांत (काका) सरडे (मा. सरपंच), धुळाभाऊ कोकरे(मा.संचालक कारखाना),चिखलठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. पांडव मॅडम,नितीन भोगे (अध्यक्ष गुरुकुल पब्लिक स्कूल करमाळा), महेंद्र वाकसे (इरा पब्लिक स्कूल टेंभुर्णी), हनुआबा सरडे, संदीपान कामटे,भारत पांडव(माजी केंद्रप्रमुख), सौ. वाकसे मॅडम, सौ.राजाबाई केदार (केडगाव पोलीस पाटील), गजेंद्र पोळ ( पत्रकार),संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, उपाध्यक्ष हरिश्चंद्र बारकुंड, सचिव सुनिल अवसरे, मुख्याध्यापक आनंद कसबे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमामध्ये मुलांनी आपले उत्कृष्ठ नृत्य सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.या स्नेहसंमेलनासाठी चिखलठाण व पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी अफाट गर्दी केली होती. न्यू इरा च्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यामधेश्री. छत्रपती शंभू महाराजांच्या गीताच्या सादरीकरणाने तर आसमंत उजळून निघाला. विविध हिंदी – मराठी, देशभक्तीपर गीत, खंडोबा गीत व विठ्ठल विठ्ठल या नृत्यांनी तर अदभुत वाहवा मिळविली.

या कार्यक्रमाचे वैशिष्टे म्हणजे सूत्रसंचालन हे इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने सादर केले.
सर्व गाणी सादरीकरण होईपर्यंत प्रेक्षकांनी आपली जागा सोडली नाही. असा भव्यदिव्य कार्यक्रम पाहून सर्व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक वर्ग, महिला प्रेक्षक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनबद्दल त्यांनी न्यु इरा टीमचे कौतुक केले.

या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रमोद हराळे, प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंद कसबे यांनी केले. संस्थाध्यक्ष डॉ बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुखांसह सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले . उत्साही वातावरणा मधे व शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.


