करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 83 वी वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा आदिनाथ देवकते यांच्या अध्यक्षतेखाली यशकल्याणी सेवाभवन येथे पार पडली. याप्रसंगी कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, शिक्षक नेते बाळासाहेब गोरे, सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय चोपडे, आबासाहेब गोडसे तसेच संचालक मंडळातील प्रताप काळे, निशांत खारगे, अरुण चौगुले, व्हा. चेअरमन तात्यासाहेब जाधव, साईनाथ देवकर, सचिव अजित कणसे, सतीश चिंदे, वैशाली महाजन, पुनम जाधव, तज्ञ संचालक वसंत बदर व व्यवस्थापकीय संचालक दिपक जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी गणेश करे पाटील यांनी ही शिक्षक पतसंस्था ‘अ’ वर्गात असल्यामुळे विश्वासास पात्र असून शिक्षकांचा आर्थिक कणा असल्याचे प्रतिपादन केले. या सभेमध्ये नूतन इमारत बांधकाम, मयत सभासद सहायता निधी उभारणे, ठेवी स्वीकारणे, ७.२०% वरून ८.४० % व्याजदर वाढ करणे यासह इतर अनेक विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी राज्य आदर्श शिक्षक बाळासाहेब बोडखे, जिल्हा आदर्श शिक्षक भारत भानवसे, प्रफुल्लता सातपुते, राणी क्षीरसागर, संपत नलावडे, श्रीकृष्ण भिसे, सतीश शिंदे, पंकज गोडगे, तसेच शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिकी स्कूल, दहावी, बारावी, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा आदी विभागातून यश संपादन केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल यादव, प्रास्ताविक प्रताप काळे, अध्यक्षीय भाषण आदिनाथ देवकते, विषय पत्रिकेचे वाचन अजित कणसे तर आभार प्रदर्शन तात्यासाहेब जाधव यांनी केले.